Tuesday, 12 April 2011

Shree Lakshmi Devi Aarti

श्री लक्ष्मी देवीची आरती

जय जय ऐश्वर्य वैभवशाली धनदाई तू सर्वाते
अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मज शब्द नसे॥धृ 
क्षीरसागरी तो वास तुझा गे 
विष्णूपत्नी तू महामाया
पद्मधारिणी पद्मानिवासिनी 
उद्योगी गृही तू नित्य वसे 
जय जय ऐश्वर्य वैभवशाली धनदाई तू सर्वाते
अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मज शब्द नसे 
तुझ्या कृपेने दुःख न येते 
सर्व असंभव संभव होते
सर्वहि अपुरे तुझ्या विना ते
तुझ्या विना मन घाबरते 
जय जय ऐश्वर्य वैभवशाली धनदाई तू सर्वाते
अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मज शब्द नसे 

No comments:

Post a Comment